सहकार महर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब)
भारत देश स्वतंत्र झाले नंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळेस महाराष्ट्राचे मंत्री आणि मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांनी राज्यात सहकार चळवळीस प्रारंभ केला त्यामुळेच आज महाराष्ट्रात १८० साखर कारखाने आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने आहेत. आणि “कृष्णा सहकारी साखर कारखाना“ महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच साखर कारखान्या मध्ये येतो. आज साखर कारखाना सुरु करणे सोपे आहे. परंतु १९५५ मध्ये सर्व टेक्नॉलॉजी आयात करावी लागत होती त्यावेळी हे काम खूप अवघड होते. परंतु मा.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांनी हे कठीण काम सोपे करत १९६० मध्ये या साखर कारखान्याची उभारणी करून एक आदर्श उभा करून दिला.
सन १९५५–५६ पासून १९८९ पर्यंत मा.श्री. जयवंतरावजी भोसले कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन होते.आपल्या दुरदृष्टीने त्यांनी कृष्णा कारखान्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचविले आहे.आज कृष्णा साखर कारखाना ऊसाला सर्वात जास्त दर देणा-या पहिल्या पाच साखर कारखान्यात नंबर वर आहे.साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद यांना प्रति ६० कि.मोफत साखर देणारा भारतातील पहिला साखर कारखाना आहे.आज या विशाल वटवृक्षाच्या छायेत आपल्या सर्व शक्तीचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मा.डॉ.श्री. सुरेश भोसले यांचा मानस आहे.