कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी जयवंत आदर्श कृषी योजनेसह विविध ऊस विकास योजनांचे सखोल व गुणात्मक परिक्षण करुन कारखान्याने नेहमीच शेतकरी सभासदांचे हित साधले आहे. आपले जीवाणू खत प्रकल्प, गांडूळखत प्रकल्प व कंपोस्ट बॅगींग या खतांना कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून राज्यात विक्री करणेचा परवाना प्राप्त झाला आहे. कारखाना जीवाणू खत प्रकल्पामध्ये आपण द्रवरूप खतांचे बरोबरच जैविक किड व बुरशीनाशकांचे उत्पादन सुरु केले आहे. सदरची सर्व जैवीक किडनाशके व बुरशीनाशके केंद्रीय किटनाशक बोर्ड, दिल्ली यांचे मानकानुसार तयार केली जातात.
" आपल्या कारखान्यामार्फत सभासद शेतकर्यांना उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेता यावे यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाते .."
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना व कृष्णा कृषी परिषद यांच्या संयुक्त विध्यमानाने वर्षभर ऊस पीक परिसंवाद आयोजित केले जातात, यामध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांना उसाचे एकरी उत्पादन, पीक नियोजन, शंका-समाधान, झीरो बजेट शेती या सोबत अनेक शेतीशी निगडीत विषयांवरती मार्गदर्शन केले जाते.
कृष्णा जैविक व सेंद्रिय उत्पादने